आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर

0

नवी दिल्ली । बांगलादेशाची राजधानी ढाका येथे होणार्‍या हिरो आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी 18 जणांचा समावेश असलेल्या भारतीय हॉकी संघांची शनीवारी घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत मनप्रीतसिंगकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर एस.वी. सुनील संघाला उपकर्णधार असेल. ही स्पर्धा पुढील महिन्यात 11 ते 22 ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. युरोप दौर्‍यात ज्युनिअर गटातील आघाडीच्या खेळाडूंना राष्ट्रीय संघातून खेळण्याची संधी देण्यात आली होती. यावेळीही या स्पर्धेकरता युवा आणि अनुभवी खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. गोलरक्षक आकाश चिकते आणि सूरज करकेराला संघात कायम ठेवण्यात आले आहे. युरोप दौर्‍यात भारतीय संघात सहभागी न झालेला डिफेंडर हरमनप्रीत अणि सुरेंद्रकुमारने पुनरागमन केले आहे. याशिवाय सुनील, सरदारसिंग, आकाशदीप आणि सतबीरसिंगही संघात परतले आहेत.

स्पर्धेत भारताचा अ गटात समावेश करण्यात आला असून याठिकाणी भारतासमोर जपान, यजमान बांगलादेश आणि पाकिस्तानचे आव्हान असेल. भारताचा पहिला सामना 11 ऑक्टोबररोजी जपानविरुद्ध होईल. 13 ऑक्टोबररोजी बांगलादेशविरुद्ध खेळल्यानंतर 15 ऑक्टोबर भारत पंरपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळेल.

भारतीय संघ – गोलरक्षक – आकाश चिकते, सूरज करकेरा. डिफेंडर – दीपसान तिर्के, कोथाजित सिंग, सुरेंद्रकुमार, हरमनप्रीतसिंग, वरूणकुमार. मिडफिल्डर : एस. के. उथप्पा, सरदारसिंग, मनप्रीत सिंग (कर्णधार), चिंगलसेना सिंग, सुमित. फॉरवर्ड – एस.वी. सुनील (उपकर्णधार), रमणदीप सिंग, ललितकुमार उपाध्याय, गुरजंतसिंग, सतबिरसिंग.