आश्रमशाळा विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करा

0

जळगाव। आदिवासी क्षेत्रातील आश्रमशाळा व जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्यतपासणी तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिल्या. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सामाजिक विकास शक्ती प्रदत समितीची बैठक जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहात झाली.

योजनांचा घेतला आढावा
यावेळी जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ तातडीने मिळण्यासाठी त्यांचे आधारकार्ड लिंक करावे, वेब पोर्टल सुरु करणेसाठी पाठपुरावा करण्याच्या सूचनांही दिल्या. यावेळी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना मॅट्रीक पूर्व शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या मुलांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आदि योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा महिला बालविकास अधिकारी रमेश काटकर, यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे, जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती राठोड, सामाजिक न्याय विभागाचे समाज कल्याण अधिकारी योगश पाटील, जिल्हा सरकारी वकील ड केतन ढाके आदि उपस्थित होते.