तळोदा। तालुक्यातील सलसाडी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. यावेळी घटनास्थळी पोहचलेले प्रकल्प अधिकारी विनय गोंडा, तहसीलदार योगेशचंद्र यांच्यावर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात हे दोन्ही अधिकारी गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना नंदूरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर नंदुरबार जिल्यात खळबळ उडाली आहे.