आश्‍चर्य! जन्मताच चालू लागले बाळ  

0

ब्राझील ।  एखादे मूल जेव्हा जन्माला आल्यानंतर किती महिन्यात चालू लागते? असा प्रश्‍न जर का कोणी तुम्हाला विचारला तर याचे तुम्ही सहजपणे उत्तर द्याल की नऊ ते दहा महिने. पण जर का एखादं बाळ जन्माला येताच चालू लागले असे जर का तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? नक्कीच नाही बसणार. हे कसे काय शक्य आहे असे म्हणत तुम्ही समोरच्या व्यक्तीची खिल्ली उडवाल. पण हीच अशक्य गोष्ट शक्य करणारं बाळ सध्या सोशल मीडियावर धुमाकळू घालत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे बाळ पाहून तुम्ही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओमध्ये नुकतेच जन्मलेले बाळ नर्स आपल्या हातात उचलून घेते आणि थोड्याच वेळात ते बाळ चालू लागते. व्हिडिओत नर्स मुलाला चालवण्याचा प्रयत्न करते, आणि बाळही तिच्या मदतीने चालू लागते.   ब्राझिलमधला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नवजात बाळाचा हा व्हिडीओ एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. फेसबूकवर हा व्हिडिओ व्हायरल होत असून अनेकांनी तो शेअर केला आहे. हा व्हिडिओ 25 मे रोजी ब्राझिलमधून अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत पाच कोटींपेक्षा जास्त जणांना पाहिला असून 13 लाख जणांनी तो शेअर केला आहे.