आश्‍वासनपुर्तीसाठी काँग्रेसचा तहसिल कार्यालयावर मोर्चा

0

भुसावळ। गेल्या तीन वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना आश्‍वासने दिली होती. मत्रि सरकार हि आश्‍वासने पुर्ण करण्यास असमर्थ ठरत असल्यामुळे या निषेधार्थ शहर काँग्रेस कमेटीतर्फे गुरुवार 8 रोजी महात्मा गांधी पुतळ्यापासून तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या विविध मागण्यांसदर्भात निवेदन दिले. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने संपुर्ण परिसर दणाणून निघाला.

शासकीय योजनांचा गरजूंना लाभ मिळावा
यामध्ये शेतकरी हिताच्या दृष्टीने सरकारने निर्णय घ्यावेत, पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले असून ते आवाक्यात आणावे, जनधन योजना आणि मुद्रा लोन योजनेचा खर्‍या गरजूंना लाभ मिळवून द्यावा, शेतकर्‍यांसाठी पूर्ण वेळ विज पुरवठा करण्यात यावा, शेतमालास हमीभाव देण्यात यावा, कापसाची भाववाढ करावी यासह निवडणूकीपूर्वी देण्यात आलेली आश्‍वासने शासनाने पूर्ण करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

नोटबंदी निर्णयाचा केला निषेध
तसेच शासनाने नोटबंदी करुन यात अनेक उद्योजकांचे नुकसान झाले असून उद्योग धंदे बंद पडले आहेत. यामुळे येथील कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली असल्यामुळे या निर्णयाचा निषेध करण्यात आला.

यांनी घेतला सहभाग
तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष रविंद्र निकम, प्रदेश प्रतिनिधी योगेंद्रसिंग पाटील, शहर सरचिटणीस रहिम कुरेशी, भगवान मेढे, विवेक नरवाडे, शफाक काझी, विलास खरात, सलीम गवळी, संजय खडसे, भिमराव तायडे, कल्पना तायडे, रामअवतार परदेशी, अन्वर तडवी, शफिक खान, अख्तर गवळी, प्रकाश मोरे, यासीन तडवी, प्रशांत पाटील, अजमल तडवी, महेबुब खान, बबलु माळी, फिरोज खान, कैलास चौधरी यांनी आंदोलनात सहभाग घेतला.