आषाढीनिमित्त पंढरपूरसाठी 11 रोजी विशेष रेल्वे

0

माजी मंत्री खडसे व खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना यश

भुसावळ- आषाढी एकादशीनिमित्त माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांनी पंढरपूरला जाण्यासाठी वारकरी व भाविकांसाठी विशेष रेल्वेचे 11 जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील भाविक आणि वारकरी आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जातात. त्यांच्या सोयीसाठी 11 जुलै राजी भुसावळवरून पंढरपूर साठी विशेष रेल्वे सकाळी 9.15 मिनिटांनी भुसावळ येथून सुटणार आहे तर रात्री 10.10 वाजता ही गाडी पंढरपूरला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी 12 जुलैच्या रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी पंढरपूर येथून सुटेल व 13 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी भुसावळ येथे पोहोचेल.. वारकरी व भाविकांनी या ट्रेनचा लाभ मोठ्या प्रमाणावर घ्यावा, असे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी केले आहे.