नवी सांगवी : कोकाटे तालीम मंडळ (ट्रस्ट) पाषाण यांच्यावतीने संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यामध्ये वारकर्यांसाठी गेली अनेक वर्षे टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारे मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट पिंपरी-चिंचवड शहरचे अध्यक्ष अरुण पवार यांना सन्मानित करण्यात आले. कोकाटे तालीम मंडळा तर्फे गणेश मुर्ती स्थापनेनिमित्त हरिनाम सप्ताहाचे प्रतिवर्षी आयोजन करण्यात येते. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या व्यक्तीचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी अरुण पवार यांना विशेष कार्यासाठी आळंदीचे ह.भ.प ज्ञानेश्वर (माऊली) कदम महाराज यांच्या हस्ते गौरवचिन्ह, फेटा, पताका, उपरणे, टाळ देवून सन्मान करण्यात आला.
यासोबतच व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन करणार्या अनिता गाडगीळ, समाजसेवेबद्दल अशोकराव साठे, आबासाहेब सुतार, गुलाबराव तापकीर, सरपंच बबनराव धावडे, मधुकर रणपिसे, सचिन पवार, हिंद केसरी पै. विजय गावडे, ह.भ.प. बबनराव भेगडे यांचा सत्कार करण्यात आला. आषाढी वारीत वारकर्यांच्या सेवेसाठी ह.भ.प. ज्ञानेश्वर कदम महाराज यांना बाळासाहेब चांदोरे व पै. सचिन पवार ताथवडे यांच्यावतीने मृदुंग भेट देण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन संतसेवक मारुती कोकाटे यानी केले होते. याप्रसंगी समाजभूषण शांताराम महाराज निम्हण, मृदुंगाचार्य पांडुरंग दातार, ह.भ.प. भानुदास वळे, मंडळाचे अध्यक्ष उद्धव वळे, राहुल कोकाटे, पै. सुरेश कोकाटे, अंबादास कोकाटे, नंदु कोकाटे, दत्तात्रय कोकाटे, अॅड. गोविंद कोकाटे, अॅड. नितीन कोकाटे आदी उपस्थित होते.