आष्टे जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना व्हाट्सएपद्वारे शिक्षण

0

तळोदा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी लागू असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी निराशा पसरलेली असतांना तळोदा तालुक्यातील आष्टे गावातील जिल्हा परिषद शाळेने तंत्रज्ञानाच्या मदतीने शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा आशेचे किरण निर्माण केल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तळोदा येथील गटशिक्षण अधिकारी शेखर धनगर यांच्या मार्गदर्शनानुसार अाष्टे येथील जि.प.शाळेचे आदर्श मुख्याध्यापक कैलास लोहार यांच्या संकल्पनेतून विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालक व शिक्षकांचा व्हॉट्सऍप ग्रुप तयार करण्यात आला. या ग्रुपच्या मदतीने शिक्षक विद्यार्थांचा अभ्यास करवून घेतांना दिसून येत आहे. या ग्रुपवर विद्यार्थांचे पालक आपल्या मुलाचे अभ्यास करतांनाचे विडिओ व फोटो पाठवून मुलाचा अभ्यास करवून घेतांना दिसत आहेत.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. संपूर्ण देशात या माध्यामातून विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान टाळता येऊ शकेल हा संदेशच जणू या शाळेने सर्वांना दिला आहे.