नंदुरबार। तालुक्यातील आष्टे येथे 68 वर्षीय वृद्धा महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने गावात फवारणी करण्यात आली आहे. दरम्यान येथील संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्क साखळीतील 35 व्यक्तींना खाजगी रुग्णालयात क्वॉरंटाईन करण्यात आले आहेत. तर 5 इतर व्यक्तींना शासकीय क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार आता ग्रामीण भागात देखील पसरत असल्याने खबरदारी घेतली जात आहे.