नंदुरबार । तालुक्यातील आष्टे येथे वंजारी सेवा संघाची शाखा स्थापन होवून फलक अनावरण करण्यात आले. यावेळी शाखेची नुतन कार्यकारिणीही गठीत करण्यात आली. वंजारी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम काळे, महासचिव प्रफुल्ल वंजारी, जिल्हाध्यक्ष रविंद्र भाबड, तालुकाध्यक्ष युवराज भाबड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत फलक अनावरण कार्यक्रम झाला. यानंतर बैठक घेवून शाखेची कार्यकारिणी घोषीत करण्यात आली. आष्टे शाखेच्या अध्यक्षपदी देवेंद्र उखाजी आघाव, उपाध्यक्षपदी श्रीराम गाठे, सचिवपदी जितेंद्र हेमाडे तर सदस्य म्हणून गणेश खाडे, प्रकाश आघाव, योगेश खाडे, भुषण काळे, श्रीराम आघाव, प्रविण वराडे, शरद गाठे, सोमनाथ घुगे, जगदिश खाडे यांची निवड करण्यात आली. मार्गदर्शन करताना श्री.काळे म्हणाले की, समाज एकसंघ राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. आपली संघटना ही कुठल्याही पक्षाची किंवा राजकारणी नसून एक सामाजिक चळवळ उभी रहावी या उद्देशाने तसेच समाज एकसंघ ठेवण्याचे कार्य वंजारी सेवा संघ (असो.) करेल. यावेळी निंबा हेमाडे, राहुल आव्हाड, राजु धात्रक, युवराज भाबड, हरिष काकडे, राहुल नागरे, कैलास काळे, आनंदा हेमाडे, उखाजी आघाव, उत्तम हेमाडे, दत्तात्रय आघाव, बापू खाडे, बापु काळे, भाऊसाहेब गाठे, भुषण हेमाडे, किशोर सिंधी, नारायण ढोडरे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस सिद्धांत खाडे यांनी केले.