नांद्रा । आसनखेडा येथे अखंड संगीत भागवत व किर्तन सप्ताहाची सांगता उत्साहापूर्ण वातावरणात करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत व माजी आमदार आर.ओ.पाटील यांचा सरपंच शिवाजी तावडे यांनी सत्कार केला. मुंबई जोगेश्वरी विधान सभाउप कक्ष प्रमुख प्रा.समाधान पाटील यांनी आयोजित केलेल्या अखंड संगीत भागवत व किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांचा केला सत्कार
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, पप्पु राजपुत, भरत खंडेलवाल, गणेश पाटील, राजेंद्र पाटील, पंकज बाविस्कर यांच्यासह पदाधिकारी यांची उपस्थिती देऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. भागवताचार्य ह.भ.प.कल्पेश महाराज कळमसरा यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली. उपंसरपंच कैलास पाटील यांनी सप्तहाचे नियोजन केले.यासाठी आसनखेडा व परिसरातील भजनी मंडळाने सहकार्य केले.