आसरबारी शिवारात 13 हजारांची गावठी दारू जप्त

यावल : तालुक्यातील वड्री जवळील आसरबारी पाड्याच्या शिवारातील धरणाच्या चारीजवळ अवैधरीत्या गावठी दारू तयार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत गावठी दारूसह दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, साहित्य मिळून 13 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. संशयीत मोहसीन तडवी याच्याविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार असलम खान करीत आहे.

यांनी केली कारवाई
यावल पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान दिलावर खान, हवालदार बालक बार्‍हे, सुशील घुगेर, राजेश वाढे, रोहिल गणेश, गणेश ढाकणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.