शिरपूर। किसान विद्याप्रसारक संस्था संचलित डॉ. बी. आर.आंबेडकर अध्यापक विद्यालय बोराडी येथील प्रा. अरविंदा भामरे, जवखेडा ता. शिरपूर यांच्या आसवांचा विद्रोह या पहील्या काव्य संग्रहाला महाराष्ट्र शासन पुरस्कृत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळातर्फे नवलेखक अनुदान योजनेअंतर्गत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदा ही नवलेखक अनुदान योजने अंतर्गत महाराष्ट्रातून नवलेखकांकडून साहित्य मागवण्यात आले होते. यात काव्यप्रकारात तीनशे काव्य संग्रह आले होते.
काव्यलेखनाच्या तपश्चर्येला अखेर यश
मंडळाने साहित्य परिक्षणासाठी महाराष्ट्रातील तज्ञ व ज्येष्ठ साहित्यिकांकडे सदर साहीत्य प्रस्ताव पाठविले होते.यात अरविंदा भामरे यांचा आसवांचा विद्रोह या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या संग्रहाचा संपूर्ण प्रकाशनाचा खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे.अरविंदा भामरे हे गेल्या अनेक वर्षापासून काव्य लेखन करीत आहेत. त्यांच्या काव्यलेखनाच्या तपश्चर्याला अखेर यश आले अशी साहीत्य वर्तुळात चर्चा होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल साहीत्य, सामाजिक, तुषार रंधे, निशांत रंधे, आशा रंधे, बी. डी. पाटील, डॉ. फूला बागूल , शिरपूर अंकूर साहीत्य मंडळाच्या अध्यक्षा व साहित्यिक सारीका रंधे, अंकूर साहीत्य मंडळाच्या अध्यक्षा साधना निकम, साहित्यिक गजलकार व शिवव्याखाते सदाशिव सूर्यवंशी,शिरपूरचे ज्येष्ठ साहित्यिक बापूसाहेब एम. के. भामरे, साहित्यिक रजनी लूंगसे, शिरपूरचे नगरसेवक बाबासाहेब रोहीत रंधे, किसान विद्या प्रसारक संस्थेच्या सहकारी पतपेढीचे चेअरमन शशांक रंधे,व्हा. चेअरमन टी. टी बडगुजर, डॉ. बी .आर . आंबेडकर अध्यापक विद्यालयतील सर्व प्रा. व शिक्षकेतर कर्मचारी, बोराडीतील कर्मवीर नगरचे सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे