व्हॉलीबॉल स्पर्धा 31 मार्चपर्यंत सुरु
पिंपरी : येथील सुपर मित्र मंडळ व आसवानी असोसिएट यांच्या संयुक्त विद्यमाने व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार आण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते योगेश बहल, मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख आशिष मालपाणी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक नाना काटे, शीतल शिंदे, डब्बू आसवानी, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, हरेश आसवानी, बांधकाम व्यावसायिक राजू आसवानी, श्रीचंद आसवानी, संदीप शहा, प्राध्यापक अनुप कदम, माजी शिक्षण मंडळ सभापती चेतन घुले, किशन भन्साळी, सुनील चुगाणी, पवन भोजवानी, निखिल आहुजा आदी उपस्थित होते.
खेळामुळे आरोग्याला फायदा
यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, सध्याच्या धावपळीच्या युगात आरोग्याकडे लक्ष देण्यास माणसाला वेळ मिळत नाही. त्यामुळे अशा स्पर्धेमुळे माणसाच्या आरोग्याला फायदाच होतो. कोणत्याही एका खेळाकडे आकर्षित न होता वेगवेगळे खेळ खेळले पाहिजेत ही काळाची गरज आहे. सुपर मित्र मंडळाचे मुख्य मार्गदर्शक डब्बू आसवानी म्हणाले की, मागील 25 वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील विविध भागातील नामांकित संघ सहभाग घेत असतात.
आसवानी कप 2018 व्हॉलीबॉल स्पर्धा 31 मार्चपर्यंत सुरु असणार असून या स्पर्धेत एकूण दहा टीम सहभागी होणार आहेत. प्रथम क्रमांकाच्या संघास 55 हजार 555 रुपये रोख व ट्रॉफी दिली जाणार आहे. तर दुसर्या क्रमांकाचे बक्षीस 22 हजार 222 रुपये व ट्रॉफीतसेच तिसर्या क्रमांकाचे बक्षीस ट्रॉफी व मेडल बरोबर उत्कृष्ठ खेळाडू, उत्कृष्ट नेटमॅन, असे बक्षीस दिली जाणार आहेत.