शहादा । तालुक्यातील आसुस शिवारातील पाच शेतकर्यांचा शेतातुन १६ विजेचा खांब्याचा अल्युमिनियम तारा सुमारे २६ हजार ३६० रु किमतीचा चोरुन नेल्याची घटना घडली असुन त्याबाबत शहादा पोलीसात अनोळखी चोराविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नरेश रतिलाल पाटील रा. लोणखेडा ता. शहादा या शेतकर्यांचे आसुस शिवारात शेतजमीन आहे. त्यांचा शेतातुन जाणार्या १६ विजेचा खांबावरील लघुदाबाचा विद्युत तारा सुमारे दोन हजार ८८० मिटर विद्युत प्रवाहाचा तारा अज्ञात चोरट्यांनी १८ सप्टेंबर रोजी रात्रीचा सुमारास चोरुन नेल्याचे लक्षात आले. चोरीची घटना शेतकरी आपल्या शेतात पीक पहाणीसाठी गेला असता लक्षात आली. याबाबतची माहिती विज वितरणाच्या अधिकार्यांना शेतकरी नरेश पाटील यानी दिली. विज वितरण पथकांने घटनास्थळी पाहणी करुन पंचनामा केला. शहादा पोलीसांत विद्युत वितरण कर्मचारी यशपाल गिरासे ह्यांचा फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका सुनिल पाडवी करत आहे.