आसोदा येथील पाणी पुरवठा योजनेची पाहणी

0

जळगाव । पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जळगाव तालुक्यातील आसोदा येथील पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण असून हे कामाची गती वाढवून काम लवकर पुर्ण करण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी येथे दिले. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी या योजने अंतर्गत झालेल्या कामांची पाहणी केली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके आदी उपस्थित होते.

सहकारमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदे आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी स्थानिक पाणी पुरवठा समिती सदस्य व ग्रामस्थांनी तक्रारी मांडल्या होत्या. आसोदा नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 5 कोटी 63 लक्ष रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.