जळगाव : तालुक्यातील आसोदा गावात रंगात आलेला जुगाराचा डाव उसहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने छापा टाकून उधळत दिड लाखांचा मुद्देमाल जप्त केला तर संशयीत पसार झाले. या कारवाईने जुगारींच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव तालुक्यातील आसोदा-आव्हाने रोडवर असलेल्या वीटभट्टीजवळ झन्नामन्ना जुगार सुरू असल्याचे सहा.पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांना रविवारी 24 एप्रिल रोजी सायंकाळी मिळताच त्यांनी कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार पथकाने रात्री नऊ वाजता पोलिसांनी छापा टाकताच संशयीत पसार झाले तर दोघांना ताब्यात घेण्यात आले.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार, पोलिस नाईक रवींद्र मोतीराया, कॉन्स्टेबल अशोक फुसे, कॉन्स्टेबल आकाश शिंपी, आकाश माळी, संतोष जाधव, जीवन जाधव, रवींद्र कारकळ, ज्ञानेश्वर कोळी आदींच्या पथकाने केली.
दिड लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी अडीच हजारांची रोकड तसेच दुचाकी (एम.एच. 19 डी.डब्ल्यू.9649, एम.एच.19 के.2852, एम.एच. 19 सी.टी. 92, एम.एच.19 डी.एच.50, एम.एच.21 ए.वाय. 6074 तसेच एम.एच. 19 ए.झेड.7884) सह एकूण एक लाख 57 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस नाईक ज्ञानेश्वर काळी यांच्या फिर्यादीवरून जितेंद्र उर्फ रवी बाबुराव देशमुख, पद्माकर पुरुषोत्तम कोळी दोघे (रा.असोदा, ता.जळगाव) आणि 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा या तीन जणांविरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.