आ.गोटे व मोरे यांच्यात सोशल मिडियात ‘वॉर’

0

धुळे। राजकारण्यांनी आता सोशल मीडियाचा वापर करून एकमेकावर चिखलफेक सुरु केली आहे. येथील शहराचे आ.अनिल गोटे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज मोरे यांच्यात आता सोशल मिडीयावर ’मेसेज’युध्द भडकले आहे. यात लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांनीही उडी घेत अतिशय शिवराळ भाषेत मोरे यांना टार्गेट करायला सुरवात केली आहे.

स्वतः आ.गोटेही यात मागे नसून त्यांनीही मोरे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. कालपासून सोशल मिडीयावर आ.गोटे विरुध्द मोरे यांच्या भांडणाचीच चर्चा सुरु आहे.आ.गोटे, समर्थक आणि मनोज मोरे व त्यांचे समर्थक यांच्यात सोशल मिडीयावर सुरु असलेल्या भांडणाची चर्चा शहरभर पसरली होती. विविध प्रकारच्या काही ग्रुपवरही हे भांडण सुरुच होते. आता हे भांडण कुठल्या स्तरापर्यंत पोहोचते, याची उत्सुकता धुळेकरांना लागली आहे. धुळे शहरातील दारू दुकांनाना शहरात दाखल करुन घेण्यासाठी महापालिकेत ठराव करण्याचा घाट राष्ट्रवादी घालत असल्याचा आरोप करीत आ.अनिल गोटे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. नव्हे तर ते आज दिल्लीत दाखल झाल्याच्या पोस्ट सोशल मिडीयावर झळकल्यात. मात्र, आ.गोटे यांच्या पत्रकाला राष्ट्रवादीचे मनोज मोरे यांनी उत्तर देतांना मल्हार बागेत झालेल्या ’डिल’चा आरोप करीत आ.गोटेंवर शरसंधान साधले. हा आरोप जिव्हारी लागल्याने आ.गोटे व त्यांच्या समर्थकांनी थेट मनोज मोरे यांच्याविरुध्द सोशल मिडीयावर शिवराळ भाषेत विविध पोस्ट टाकायला सुरवात केली. मोरेंविरुध्द टाकण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही संतापाची भावना उमटली. या कमरेखालच्या शिवराळ भाषेचा मात्र मनोज मोरे यांनी संयमाने समाचार घेतला.