आ.पटेलांच्या वाढदिवसानिमित्त इंग्रजी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

0

शिरपूर । शहरातील आर.सी.पटेल प्राथमिक विद्यालयात आमदार अमरीशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत तालुक्यातील अठ्ठेचाळीस शाळेतील 300 विद्यार्थ्यानीं सहभाग घेतला होता. इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, मुख्याध्यापक सी. डी. पाटील, मुख्याध्यापक गणेश साळुंखे, मुख्याध्यापक महेंद्र परदेशी,प्राचार्य डॉ.राहुल सनेर,प्राचार्य पी.व्ही.पाटील,प्राचार्या मीना अग्रवाल,रवी बेलाडकर आदी उपस्थित होते. स्पर्धेत सात वेगवेगळे गट करण्यात आले होते. यासाठी अठरा इंग्रजी शिक्षकांनी परीक्षणाचे काम
पाहिले.

प्रथम तीन क्रमांकासह उत्तेजनार्थ बक्षीसे
स्पर्धेच्या सुरुवातीला वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी आमदार अमरीशभाई पटेल यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकासह उत्तेजनार्थ बक्षीस ही देण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन महेंद्र माळी व अविनाश राजपूत यांनी केले.या स्पर्धेत तीस बक्षीसे जाहीर करण्यात आली. बक्षीस वितरण समारंभ आमदार अमरीशभाई पटेल यांच्या उपस्थितीत लवकरच करण्यात येणार आहे. इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा ही प्राथमिक शाळांसाठी घेतली जाते हे कौतुकास्पद आहे.यातून प्राथमिक शिक्षणापासून विद्यार्थ्याना इंग्रजी विषयी चांगली संधी मिळते.विद्यार्थ्यांबरोबर यापुढे शिक्षकांनाही गौरविले जाणे गरजेचे असल्याचे सांगितले.