धुळे । ज्यां च्या परिवाराने 45 वर्ष सत्ता व पदे उपभोगताना सहकारी संस्था लुटून बंद पाडल्यात. ज्यांच्या परिवाराच्या लुटारु धोरणामुळे धुळे तालुक्यासकट जिल्ह्यातील सहकारी संस्थांमधील शेतकर्यांचे करोडो रुपयांचे भागभांडवलाचे मुल्य शून्य झाले. जे आमदार झाल्यानंतर मतदार संघातील मतदारांना उन्हात सोडून स्वत:चा उन्हाचा त्रास वाचविण्यासाठी ज्यांना दर उन्हाळ्यात पत्नी मुलांसह लंडन व स्विझरलॅन्डला महिना-महिना आराम करायलाजावे लागते, त्या आ.कुणाल पाटलांनी शेतकरी कर्जमाफीचा विषय व शेतकर्यांचा कळवळा शिवसेना पक्षाला शिकवू नये, असे सडेतोड पत्रक धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
कर्जमाफीचा अधिकार विधानसभेला
जिल्हा नियोजन मंडळात कुठल्याही पक्षीय सदस्यांशी व आमदारांशी चर्चा न करता आ.कुणाल पाटील यांनी शेतकर्यांना कर्जमाफीचा तोंडी प्रस्ताव मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी केलेल्या चुकीच्या पत्रकबाजीबद्दल शिवसेनेचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी कुणाल पाटलांना हे सडेतोड उत्तर दिले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाली. ही बैठक सुरु होण्यापुर्वी कुणाल पाटील यांनी या बैठकीत महाराष्ट्रातील शेतकर्यांना कर्जमाफी करा, असा ठराव करण्याची तोंडी सूचना मांडली. यावेळी असा ठराव करण्याचे अधिकार जिल्हा नियोजन मंडळाला नसून हा महाराष्ट्र विधानसभा व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तो अधिकार असल्याचे व तसा नियोजन मंडळाला घटनात्मक अधिकार नसल्याचे धुळ्याचे भाजपा आमदार अनिलआण्णा गोटे यांनी स्पष्ट केले.
कुणाल पाटील हे गेल्या 30 महिन्यांपासून मतदार संघात जनतेला दिसत नाहीत. अधिवेशन आले की त्यांची धावपळ होते. विधानसभेत जिल्ह्यातील अनेक प्रश्न मांडण्याची त्यांना संधी असताना त्यांचा होमवर्क नसतो. धुळ्याच्या स्थानिक पत्रकारांकडून देखील काही महत्वाचे प्रश्न समजून घेवून आमदारांना विधानसभेत मांडता येतात. मी आमदार असताना जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र प्रतिनिधींशी सलोख्याचे संबंध ठेवून जिल्ह्याचे प्रश्न समजून घेत होतो व त्याचा प्राधान्यक्रमही ठरवून घेत होतो. डिसेंबर 2012 पयरत मी अ क्कलपाडा धरणाला प्राधान्यक्रमावर ठेवले होते म्हणूनच हे धरण डिसेंबर 2013 पयरत 100 ट क्के पूर्ण झाले. कुणाल पाटीलांनी तालुक्याच्या प्रश्नांबाबत व विधानसभा आणि विविध शासकीय बैठकांच्या कामकाजाबाबत पहिल्यांदा अभ्यास करावा आणि स्वत:चे हसे करुन घेवू नये, हा वडिलकीचा सल्लाही प्रा.शरद पाटील यांनी कुणाल पाटील यांना दिला आहे. आ.कुणाल पाटलांपेक्षा माजीमंत्री रोहिदास पाटील सरसच! गेल्या 2 वर्षातला कुणाल पाटलांचे महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज पाहिले असता ते कुठेही उल्लेखनीय दिसत नाही. कुणाल पाटील हे औचित्याच्या मुद्यांचे वाचन करुन त्याची बातमी धुळ्यात वृत्तपत्रांकडे पाठवितात.
पत्रकारांना चुकीची माहिती दिली
विधानसभेत उपस्थित करुन त्यावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर घेण्याची जबाबदारी आमदारांची असते. मात्र सभागृहात कामकाजप्रसंगी सतत गैरहजर असणार्या आमदारांनी सदर विषय येथे उपस्थित करुन अज्ञान प्रकट करु नये, असे जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले. आ.कुणाल पाटील हे सदर प्रस्ताव मांडत असतांना त्यांच्या शेजारी साक्रीचे काँग्रेसचे आमदार डी.एस.अहिरे, व्यासपीठावर उपस्थितीत असणारे जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते, काँग्रेसचे समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, काँग्रेसच्या जि.प.सदस्या भारती अहिरराव, काँग्रेसच्या जि.प.च्या शिक्षण व आरोग्य सभापती नूतन पाटील यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. या सभागृहात आमदार अमरीश पटेल, आमदार काशीनाथ पावरा हे गैरहजर होते. कुठल्याही संसदीय कामकाजाची माहिती नसणारे कुणाल पाटील यांना वरीलपैकी एकाही सदस्यांनी यावेळी पाठिंबा दर्शविला नाही किंवा सभात्यागही केला नाही. त्यामुळे एकाकी पडलेल्या कुणाल पाटलांनी बाहेर जावून पत्रकारांना चुकीची माहिती दिली व पत्रकबाजी केली.