आ.रोहित पवारांकडून ३६ जिल्ह्यांत सॅनिटायझरचे मोफत वाटप

0

मुंबई – राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमध्ये ४० हजार लीटरपेक्षा जास्त सॅनिटायझरचा मोफत पुरवठा केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून काही दिवसांमध्येच बाजारात सॅनिटायझर्सचा तुटवडा निर्माण होवून काळाबाजारही सुरू झाला. या संकट काळात रोहित पवार यांनी कर्जत जामखेड एकात्मिक संस्था आणि बारामती ग्रो यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण राज्यात सॅनिटायझरचा पुरवठा करण्याची योजना आखली. त्यांनी आतापर्यंत राज्यातल्या ३६ जिल्ह्यांमध्ये सरकारी रुग्णालये, पोलीस स्टेशन, वैद्यकीय संस्था, धार्मिक संस्था, सरकारी कार्यालये या ठिकाणी तब्बल ४० हजार लीटर सॅनिटायझरचा पुरवठा केला आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातील सरकारी, वैद्यकीय आणि धार्मिक संस्थांमध्ये येणार्‍या प्रत्येकाला ती उपलब्ध व्हावी, हाच आमचा प्रयत्न आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले. सॅनिटायझरबरोबरच मास्क आणि संसर्गाला प्रतिबंध करणारे चष्मे यांचे उत्पादनही या संस्थांमार्फत केले जात असून या गोष्टी वैद्यकीय संस्था, रुग्णालयात पोहोचवल्या जात आहेत. सध्याच्या काळात लोकांनी एकत्र येऊन एकमेकांना धीर देण्याची गरज आहे, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.