जळगाव । जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष, सिनेट सदस्य, आ.डॉ.सतिशअण्णा पाटील यांचा गौरव सोहळा 28 रोजी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत दुपारी 4.30 वा.नुतन मराठा कॉलेजमध्ये होणार आहे. यावेळी मान्यवरांच्याहस्ते त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीचा आढावा सत्काररुपाने करण्यात येईल. उपस्थितीचे आवाहन गौरव समितीने केले आहे.
या मान्यवरांची लाभणार उपस्थिती
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार्या या कार्यक्रमासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विरोधी पक्षनेते विधान परिषद ना.धनंजय मुंडे, सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील, माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह नरेंद्र पाटील, अशोक जैन, अरुणभाई गुजराथी, ईश्वरलाल जैन, अॅड.वसंतराव मोरेकाका, आ.हरीभाऊ जावळे, आ.संजय सावकारे, आ.चंद्रकांत सोनवणे, आ.किशोर पाटील, आ.राजुमामा भोळे, आ.उन्मेश पाटील, आ.शिरीष चौधरी, आ.स्मिता वाघ, आ.डॉ.सुधीर तांबे, गुलाबराव देवकर, साहेबराव पाटील, राजीव देशमुख, माजी आ.शिरीष चौधरी, अरुण पाटील, संतोष चौधरी, दिलीप वाघ, दिलीप सोनवणे, अॅड.रोहिणीताई खडसे-खेवलकर, अॅड.रविंद्रभैया पाटील, हाजी गफ्फार मलिक यांच्या उपस्थितीत हा गौरवसोहळा होत आहे. कार्यक्रम वेळेवर सुरु होणार असल्याने वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन आ.सतिश पाटील, जिल्हा बँक संचालक संजय पवार यांनी केले आहे.