इंग्रजी व्याकरण परीक्षेत भगीरथ शाळेचे यश

0

जळगाव : टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुर्ण यांच्यातर्फे घेतल्या जाणार्‍या सिनियर इंग्रजी ग्रामर परीक्षेत भगीरथ शाळेचा शंभर टक्के निकाला लागला असून सलग सहाव्यांदा शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. यावर्षी शाळेतील 71 विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते. परिक्षेत प्रथम क्रमांक मिळविणार्‍या सौरभ मोरे याला 88 गुण मिळविले आहे. परिक्षेत द्वितीय क्रमांक दिपाली नाईक, मोहन सोनवणे यांनी तर तृतीय क्रमांक सोपान मोरे यांनी मिळविले आहे.

परिक्षेत प्रथम श्रेणीत 12 विद्यार्थी उत्तीर्ण
परिक्षेत प्रथम श्रेणीत 12 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 13 तर तृतीय श्रेणीत 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. शाळेतील शिक्षक किशोर पाटील आणि किरण पाटील यांनी विद्यार्थ्यांना रोज एक तास शाळेव्यतिरिक्त परिक्षेविषयी विशेष मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनानेच शाळेचा सहाव्यांदा शंभर टक्के निकाल लागला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका आशा चौधरी, उपमुख्याध्यापिका नेहा जोशी, पर्यवेक्षक किशोर राजे, जेष्ठ कला शिक्षक एस.डी.भिरुड यांनी यशस्वी विद्यार्थ्याना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविले. तसेच मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचे अभिनंदन केले.