शिरपूर । येथील डॉ. विजयराव व्ही. रंधे इंग्लीश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खर्दे येथील संजीवनी ग्रीन हाउसला भेट देऊन वनभोजनाचा आनंद घेतला. शहरी वातावरणात वाढ होत असलेल्या विद्यार्थ्यांना येथे सम्पूर्ण ग्रामीण पद्धतीची घरांची रचना व हाताने बनविलेल्या वस्तु पाहण्यास मिळाल्या. तसेच विविध प्रकारची वनस्पतींची मुलांना ओळख झाली.
हरितगृहाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सर्व भिंती व पूर्ण छत पारदर्शक असणारी काचेची मानव निर्मित एक कृत्रिम खोली म्हणजे हरितगृह. त्याच प्रमाणे पारंपारिक शेतकरी आपल्या शेतीत सुधारणा कशी करतात व दर्जेदार अधिक उत्पादनासाठी हरितगृहातील शेती फायद्याची ठरते. हरित गृहाबद्दल माहिती संजीवनी हाउसचे संचालक संजय गुजर यांनी दिली. या क्षेत्र भेटीसाठी मुख्याध्यापिका सारिका ततार , गायत्री देवरे , योगीता पाटील, सुवर्णा पाटील, प्रमोद पाटील , मोहनीश तायडे , निलेश बडगुजर यांनी परिश्रम घेतले.