इंजिनिअरचा मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज!

0

मुंबई । भारतीय संघासाठी मुख्य परिक्षक निवडीचे काम सुरू असतांना यामध्ये मुख्य प्रशिक्षकपदासाठी एका इंजिनिअर तरूणाने अर्ज केला आहे. अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी आणि लालचंद राजपूत यांच्यासारख्या अनेक दिग्गजांन बरोबर 30 वर्षाच्या उपेंद्रनाथ ब्रह्मचारी या तरुणानेही अर्ज केला आहे.मेकॅनिकल इंजिनिअर असणार्‍या उपेंद्रनाथने बीसीसीआयच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याने अर्ज फक्त कर्णधार विराट कोहलीला ठिकाणावर आणण्यासाठी केला आहेे. भारतीय क्रिकेटचे चाहत्यांना वाटते की,त्यालाही वाटते कुंबळेच्या राजीनाम्यामागे विराटचा हात आहे.त्याने दाखल केलेल्या अर्जात चुका आहेत.