इंडियन युनियन मुस्लिम लीग लोकसभा लढवणार

0

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सैय्यद अफसर अली यांची माहिती

भुसावळ- इंडियन युनियन मुस्लिम लीग पक्ष रावेर लोकसभा मतदार संघासह संपूर्ण राज्यातील जागा लढवणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सैय्यद अफसर अली यांनी शासीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परीषदेत दिली. इंडियन युनियन मुस्लिम लिगचे लोकसभेत दोन आणि राज्यसभेत एक असे तीन खासदार आहेत तर तामिळनाडूत एक व केरळमध्ये 18 आमदार आहेत. संपूर्ण भारतात मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे आणि लोकसभा आणि विधानसभेच्या जागेवर आरक्षण ठेवावे, अशी प्रमुख मागणी आहे. राज्यात मुस्लिम, दलीत व ओबीसी समाजाला नेतृत्व मिळावे यासाठी सर्व जातीधर्माच्या लोकांना लोकसभेची उमेदवारी देणार आहोत. राज्यातील सर्व 48 जागा आम्ही लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अली यांनी प्रसंगी दिली.