जळगाव। भारतात एकूण 45 कोटीहून अधिक जनता विविध आजारांनी त्रस्त असून खानपान, जीवनशैली, व्यायामाचा अभाव व रोगाचे वेळीच निदान न होणे हे प्रमुख कारण असून यावर उपाय निश्चिती करून रोगमुक्त भारत बनविण्यासाठी इंडिया हेल्थ लाईन काम करीत असल्याचे डॉ. प्रविण तोगडीया यांनी सांगितले. इंडीया हेल्थ लाईनच्या माध्यमातून आजच्या स्थितीत 10 हजार डॉक्टर प्रतिदिवस 1 पेशंट मोफत तपासणी व उपचार करीत असून 10 हजार गरीब रुग्णांना याचा लाभ होत असल्याची माहिती त्यांनी प्रशिक्षण वर्गात दिली. कार्यक्रमासाठी शहरातील 50 हून अधिक डॉक्टरांनी उपस्थिती लावली होती.
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने इंडीया हेल्थ लाईन या उपक्रमाबाबतची माहिती देण्यासाठी व हेल्थ अँबेसेडर प्रशिक्षण वर्ग हॉटेल कमल पॅरडाइस येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर इंडीया हेल्थ लाईनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रविण तोगडीया, देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ. कुलदीप राऊळ, उपाध्यक्ष डॉ. विक्रम चौबे, राजेश जहॉगीरदार, हेमंत त्रिवेदी, प्रांतसहमंत्री ललित चौधरी, डॉ. स्नेहल फेगडे, कॉ. विलास भोळे, प्रांतमंत्री अनंत पांडे, सुरेंद्र मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते. नंदुरबार, धुळे व जळगाव या तीन जिल्ह्यातील 75 हेल्थ अॅबेसेडरना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले असून, शुगर तसेच बी.पी. तपासणी यंत्राचे वितरण करण्यात आले. या यंत्राच्या आधारे संबंधी हेल्थ अँबेसिडर त्यांच्या जिल्ह्यात मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करू शकणार असल्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शैलेद्र ठाकूर, डॉ. दिनेश गायकवाड, देवेद्र भावसार, भरत कोळी, राकेश लोहार, ललित खडके, दलु कोळी, आशिष दुसाने आदींनी परीश्रम घेतले.