इंडीयन लॕंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) ची सभा दिल्लीत संपन्न
आक्टोंबरमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा, जुण्या सभासदांची शुल्क माफी व मुंबईतील नव्या कार्यालयाची प्रकाश पोहरे यांची घोषणा
अकोला–इंडीयन लॕंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) या देशभरातील सर्वभाषिक वृत्तपत्रांच्या संपादक, प्रकाशकांच्या राष्ट्रीय संघटनेची सभा दिल्लीत महाराष्ट्र सदन येथे संपन्न झाली.राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मा.प्रकाशभाऊ पोहरे यांनी मुंबईत ईलनाचे कार्यालय सुरू केल्याची माहिती देऊन संघटनेची आगामी वाटचाल आणि नियोजनाची माहिती दिली.
कामकाजातील सुलभतेसाठी काही महत्वपूर्ण विषयावरील निर्णय यावेळी घेण्यात आले.
या सभेला राष्ट्रीय सचिव संजय एम.देशमुख,बाळासाहेब आंबेकर ( सातारा) रविकुमार बिष्णोई,अंकित बिष्णोई (मेरठ- राजस्थान) रणदीप घांगस,डॉ.संदिप वर्मा,संदिप गुप्ता,व ईतर सदस्यांची उपस्थिती होती.
यावेळी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा आक्टोंबरच्या ५ ते १० तारखेच्या दरम्यान दिल्लीत घेण्याचे ठरविण्यात आले.यासाठी श्री प्रकाश पोहरे, संजय देशमुख यांनी सदस्यांसमवेत महाराष्ट्र सदन च्या हॉलची पाहणी केली.गेल्या कोरोना काळात सर्वच कामकाज विस्कळीत राहिल्याने सभासदत्वाचे नुतनीकरण वेळेत होऊ शकलेले नाही.त्यामुळे अशा सभासदांचे सन २०२१ ते २०२३ या दोन वर्षांचे सभासदत्व शुल्क माफ करण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष श्री प्रकाश पोहरे यांनी केली. यावेळी सभासद संख्या वाढवून संघटना बळकट करीत ईलनाला देशपातळीवर अजून अग्रेसर आणि प्रभावशाली करण्यासाठी सहकार्याचे आवाहन सदस्यांना केले.