इंदापुरात घोडे बाजाराला चांगला प्रतिसाद

0

इंदापूर । इंदापुरातील कृृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आयोजित शरद कृृषी महोत्सवातील घोडे बाजाराला सुरुवात झाली आहे. विविध शहरातून 225 च्या आसपास घोडे बाजारात दाखल झाल्याने शिवलीलानगरचे डाळींब मार्केट घोडे बाजार फुलून गेले आहे.बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे व उपसभापती यशवंत माने यांच्या प्रयत्नातून घोडे बाजार व शरद कृृषी महोत्सव अकलूज रोडवरील शिवलिलानगर डाळींब मार्केटमध्ये सुरू झाला आहे. घोडे बाजारास शुक्रवारपासून सुरवात झाली असून पहिल्याच दिवशी दोन घोड्यांची विक्री झाली आहे.

रविवारपासून पशु प्रदर्शन
रविवारी दुपारी 12.30 वाजता शरद कृृषी महोत्सवातील कृृषी पशु प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांच्या हस्ते होणार असून यावेळी आमदार नारायण पाटील करमाळा, रमेश थोरात, जालिंधर कामठे, विवेक वळसे पाटील, प्रविण माने, डॉ. शंकरराव मगर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कृृषी प्रदर्शन 7 ते 9 जानेवारीपर्यंत चालू राहणार आहे. तर घोडे बाजार 20 जानेवारीपर्यंत भरणार असल्याची माहीती सभापती आप्पासाहेब जगदाळे व उपसभापती यशवंत माने यांनी पत्रकार परीषदेत दिली.