इंदापुरात ‘शरद कृषी महोत्सव 2019’ चे आयोजन

0

30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रम

इंदापूर : कृषि उत्पन्न बाजार समिती इंदापूर आयोजित शरद कृषी महोत्सव 2019 अंतर्गत इंदापूर येथे 30 जानेवारी ते 2 फेबु्रवारीपर्यंत भव्य कृषि, जनावरे, प्रदर्शन व घोडे बाजार महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 30 जानेवारीला दुपारी 12.15 वाजता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार दत्तात्रय भरणे उपस्थित राहणार आहेत. कृषि प्रदर्शन बक्षीस वितरण समारंभ आणि विविध विकासकामांचा उद्घाटन समारंभ 2 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते पाटील व खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असल्याची माहीती इंदापूर कृषि उत्पन्न बदाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.

महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन

या प्रदर्शनाची तयारी सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. या कृषि प्रदर्शन व शरद कृषि महोत्सवात तालुक्यातील सर्व नागरीकांनी सहभागी होऊन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, उपसभापती यशवंत माने व सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा महोत्सव भरविण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

हे कृषि प्रदर्शन सर्वांना मोफत पाहता येणार आहे. या प्रदर्शना दरम्यान दररोज तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहे. घोडे शो, डॉग शो, चाल स्पर्धा व नाचकाम स्पर्धा आणि जातीवंत जनावरे प्रदर्शन तसेच गृहपयोगी वस्तू, खवय्यांसाठी खाऊगल्ली आणि महिलांसाठी खेळ पैठणीचा हा सुप्रसिद्ध कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.