इंदापूर । उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईच्या नागरिकांना झळा बसू नयेत व आगामी काळामध्ये पाणी टंचाईला सामोरे जाण्यासाठी इंदापूर तालुक्यासाठी सात कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली.तालुक्यामध्ये चालु वर्षी जोरदार पाउस झाला आहे. मात्र ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांची पाण्यासाठी पायपीट होवू नये यासाठी टंचाई आराखाड्याचे नियोजन केले आहे. तालुक्यातील पाच गावांमध्ये टंचाई आराखाड्यामधून जून 2018 पर्यंत नळपाणी पुरवठा योजनेच्या विशेषदुरुस्तीसाठी 27 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये वरकुटे बुद्रूक येथील बनकरवाडीसाठी 10 लाख, बिरंगुडीवाडी कळससाठी 5 लाख, खामगळवाडी-कौठळीसाठी 7 लाख, उद्धट मधील पाणी पुरवठा योजनेसाठी 5 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
टँकरसाठी 71 लाख मंजूर
तालुक्यामध्ये 112 ठिकाणी नवीन विंधन विहिरी खोदण्यासाठी 56 लाख, विधंन विहिरी दुरुस्तीसाठी 6 लाख, टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी 71 लाख 60 हजार रुपयांची तरतूद केली आहे. तालुक्यातील 13 गावामध्ये राष्ट्रीय पेयजेल योजनेतंर्गत 2018-19 साठी गागरगाव व रेडा गावासाठी प्रत्येकी (40लाख), चाकाटी व रेडणी गावासाठी प्रत्येकी (60 लाख), गोतोंडी व लाकडी गावासाठी प्रत्येकी (25 लाख), खोरोची साठी (70 लाख), न्हावी ,पिटेकेश्वर, रणगाव गावासाठी प्रत्येकी (45 लाख), जाधववाडी, पोंधवडी-पवारवाडी या दोन्ही गावांसाठी प्रत्येकी (35 लाख) व ओझरे गावासाठी 30 लाख रुपयांची तरतूद केल्याची माहिती भरणे यांनी दिली.