जळगाव । येथील मू. जे.महाविद्यालयातील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेन्द्राच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशास 15 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या 12 अभ्यासक्रमांना प्रवेश देणे सुरु झाले आहे. या 12 अभ्यासक्रमांमध्ये एम.ए.मानसशास्त्र, एम.लिब., एम.ए.तत्वज्ञान हे पदव्युत्तर तर बी.लिब.हा पदवी अभ्यासक्रम आहे. प्रयोगशाळा तंत्र, नाट्यगृह कला, दृश्य कला-उपयोजित कला, भारतीय संगीत, दृश्य कला – पेंटिंग, पाणी साठवण व व्यवस्थापन हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत. विश्लेषणात्मक रसायनशास्त्र या विषयाच्या पी.जी.डिप्लोमासह पर्यावरणाचा प्रोत्साहन अभ्यासक्रम देखील यात शिकविला जाणार आहे.
एस.सी., एस.टी. या प्रवर्गासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम मोफत असून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राहणार आहे. आदिवासी, ग्रामीण युवकांना रोजगार मिळावा, उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या करिता हे अभ्यासकेंद्र सुरु करण्यात आले आहे.