चिंबळी : ग्रामीण भागातील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच साप्रांदायिक व धार्मिक पद्धतीचे वाचन करून त्यांना ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून डॉ. रंगनाथ यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मोईचे माजी सरपंच मुरलीधर करपे यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच पुष्पाजंली कर्पे यांच्या वतीने श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालयाच्या मार्फत इंदिरा माध्यमिक विद्यालयातील 121 विद्यार्थांना व शिक्षकांना मोफत ग्रंथालय प्रवेश अर्ज देण्यात आला असून सर्व विद्यार्थांचे व शिक्षकाचे 12 हजाररुपये ग्रंथालय वार्षिक शुल्क माजी सरपंच ग्रंथालयाच्या अध्यक्ष कर्पे भरणार असल्याचे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम गवारे यांनी सांगितले
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ तोत्रे, चिंतामण रोकडे, आनंदा गवारे, सुनील कर्पे, रविंद्र गवारे, संतोष जोशी, प्रताप गिरी, राजू चौधरी, ज्ञानेश्वर कळसकर, सत्यवान ताजणे, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. पुष्पाजंली कर्पे म्हणाल्या की मुले ग्रंथालयाकडे येत नसतील तर ग्रंथ मुलांकडे नेऊ या भावानेतून सोलापूर जिल्हात या उपक्रमाचे आयोजन केले होते या उपक्रमाला जिल्हात चागंला प्रतिसाद मिळाला असल्याने पुणे जिल्हात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.