इंद्रप्रस्तनगरात घरफोडी; लाख रूपयांचा ऐवज लंपास

0

जळगाव – इंद्रप्रस्तनगरातील बंद घर फोडून चोरट्यांनी एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या
प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंदना चंद्रशेखर तारे (वय ५८) यांच्या घरी ही घटना घटना
घडली आहे. तारे ह्या इंद्रप्रस्तनगरातील घरी एकट्याच राहतात. तर त्यांचा मुलगा आणि मुलगी कल्याण (मुंबई) येथे राहतात. २३ सप्टेबर
रोजी तारे ह्या मुलांना भेटण्यासाठी मुंबईला गेल्या होत्या. बुधवारी सकाळी ६ वाजता त्या घरी परतल्या. यावेळी त्यांच्या घराचे कपाऊंड,
दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. तसेच घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त केलेला होता. तारे यांनी घरात तपासणी केली असता
कपाटातून ७ हजार रुपये रोख, २९ हजार रुपयांची सोन्याची चेन, ४५ हजार रुपयांची सोन्याची मंगलपोत, ९ हजार रुपयांच्या कानातील
रिंग, ९ हजार रुपयांचे कानातील टॉप्स व ३ हजार रुपयांचा सोन्याचा शिक्का असा एकुण १ लाख २ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे
निष्पन्न झाले. यानंतर तारे यांनी शहर पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्यानुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.