इंद्रायणीच्या दुषित पाण्यामुळे भुईमुगाचे पिक धोक्यात

0

चिंबळी । खेड तालुक्याच्या चिंबळी परिसरातील शेतकर्‍यांनी उन्हाळी हगांमातील भुईमूग पिकाची लागवड केली आहे. या पिकावर इद्रायंणी नदीच्या दुषित पाण्याचा गंभीर परिणाम झाल्याने पिक धोक्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून वाहणार्‍या इंद्रायणी नदीत चिखली एमआयडीसीचे आईल मिश्रित व सांडपाणी थेट सोडले जात आहे. त्यामुळे नदी दुषित झाली आहे. याचा परीणाम मोई, मोशी, कुरुळी, चिंबळी, मोशी, डुडूळगाव, केळगाव परिसरातील शेतकर्‍यांनी घेतलेल्या बारामाही पिकावर होत असल्याने उत्पादनात घट झाली आहे. चिंबळीतील शेतकर्‍यांनी काही दिवसांपूर्वीच भुईमूग पिकाची टोकण पद्धतीने लागवड केली आहे. कमी खर्चात व तीन महिन्याच्या अवधीत जास्त उत्पादन मिळणारे पिक असल्याने मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. परंतु इद्रायंणी नदीच्या पाण्यात पांढरेशुभ्र ऑईलमिश्रित दुषित पाणी निर्माण झाल्याने पिकाच्या वाढीवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. त्यातच कडक उन्हामुळे पिक सुकू लागले आहे.