इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मालवाहतूकदारांचा संप 

0
मुंबई :राज्यातील मालवाहतूकदारांनी सोमवारपासून संप पुकारला आहे.  इंधनातली दरवाढ,  टोल दर या कारणांमुळे संप करण्यात येत आहे. या संपात देशातले ९० लाख ट्रकचालक सहभागी होणार आहेत. या संपातून अत्यावश्यक वाहतूक सेवा वगळण्यात येणार आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये डिझेलच्या किंमतीमध्ये १७ रुपयांनी वाढ झाली आहे. थर्ड पार्टी विमादरातल्या वाढीसह टोलचाही भार सोसावा लागत असल्याणे मालवाहतूकदार नाराज आहेत.
इंधनदरातील वाढ, टोल दर, थर्ड पार्टी वाहन विमादरांतील वाढ आदींनी त्रस्त झालेल्या मालवाहतूकदारांनी पुढच्या सोमवारपासून म्हणजेच १८ जूनपासून देशव्यापी संपाची हाक दिली आहे.  गेल्या तीन महिन्यांमध्ये डिझेलच्या किंमतीमध्ये १७ रुपयांनी वाढ झाली आहे. डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली असली तरी मालवाहतुकीच्या दरांमध्ये वाढ झाली नाही. वेगवेगळ्या कारणांनी हा व्यवसाय करणे आर्थिकदृष्ट्या अवघड ठरले असून ट्रक व्यावसायिकांना त्याची झळ बसत आहे, से  असोसिएशनचे महासचिव राजिंदर सिंह यांनी सांगितले आहे.