माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना यश
मुक्ताईनगर- मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील मच्छिंद्रनाथ मंदिर, फरकांडा मारुती मंदिर, चारठाणा वन उद्यान, हरताळा वन उद्यान व माळेगाव निसर्ग पर्यटन या तीर्थक्षेत्रांसाठी इको टुरीझम अंतर्गत निधी मिळावा यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे माजी मंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले असून या पाचही तीर्थक्षेत्रांसाठी दोन कोटी 49 लाख 27 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
या कामांना मिळणार चालणा
मच्छिंद्रनाथ मंदिर या ठिकाणी 55 लाख 97 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये सभामंडप,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आकर्षक सिमेंट बाक, सेल्फी पॉइंट, तारेची जाळी, प्राण्यांचे पुतळे, सोलर लाइट, नक्षत्रवन, बांबूची झाडे ड्रीप सिस्टीम सह, बोरवेल पाईपलाईन पंपसेट आदी कामे करण्यात येणार आहेत तर चारठाणा येथे 42 लाख 36 हजार रुपये मंजूर करण्यात आले असून त्यातन वनउद्यान अंतर्गत सभामंडप, झाडांना वटे, गार्डनची कामे, पिण्याचे पाणी वाटर कूलरसह, आकर्षक व सिमेंट बाक, वन्य प्राण्यांच्या प्रतिकृती, सोलर लाइट, सेल्फी पॉइंट, भवानी मंदिराच्या चारही बाजूंना रस्ता, शोभीवंत झाडे, फुलांची झाडे, बोरवेल पंप पाईपलाईन आदी कामे करण्यात येणार आहेत तसेच हरताळा येथे 41 लाख 46 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. येथील कामांमध्ये सभामंडप, पेव्हर ब्लॉक, माहिती फलक, बगीचा देखभाल, पिण्याच्या पाण्याची वाटर कूलर सह व्यवस्था,शोभिवंत सिमेंटचे बाक, विविध प्राण्यांचे पुतळे, सेल्फी पॉइंट, सोलर लाईटींग, नक्षत्रवन आदी कामे करण्यात येणार आहेत. माळेगाव येथे 45 लाख 94 हजारांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यात सभामंडप, शोभीवंत व फुलांची झाडे, गार्डन, वॉटर कूलरसह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शोभीवंत सिमेंट बाक, स्वच्छतागृह, सेल्फी पॉइंट, सोलार लाईटींग, शोभिवंत झाडे,फुलांची झाडे, लॉन,तिकीट काउंटरआदि कामे करण्यात येणार आहेत तसेच बोदवड तालुक्यातील फरकांडा मारुती येथे 63 लाख 54 हजार रुपये मंजूर करण्यात आले. यात सभामंडप, शोभीवंत व फुलांची झाडे, पेव्हर ब्लॉक, बगीचा, वॉटर कुलरसह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शोभीवंत सिमेंटचे बाक, सेल्फी पॉइंट, तारेची जाळी, सोलर लाईटींग आदि व्यवस्था करण्यात येणार आहेत.