इडीने केली नीरव मोदीची पुण्यातील मालमत्ता जप्त

0

पुणे/नगर । पंजाब नॅशनल बँकेत हिरे व्यापारी नीरव मोदीने केलेल्या 11 हजार 400 कोटींच्या घोटाळा प्रकरणात सक्तवसुल संचालनालयाने (इडी) देशभरात छापा सुत्र सुरूच ठेवले आहे. महाराष्ट्रातही या प्रकरणी इडीची कारवाई सुरू असून पुण्यातील त्याच्या सहा निवासी मालमत्ता, दहा कार्यालये, दोन सदनिका व अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील 135 एकर जमीन अशी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

70 कोटींचा सौर प्रकल्प
पुण्यातील मालमत्ता मोदी व त्याची पत्नी अमी यांच्या नावावर आहे. हडपसर भागात नीरव मोदी याची सदनिका व मालमत्ता आहे. मोदीचा कर्जत तालुक्यात 53 एकर जागेत 70 कोटींचा सौर प्रकल्प आहे. मोदीची एकूण 6393 कोटी रूपयांची मालमत्ता आत्तापर्यंत जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्यातील आरोपी असलेला मनोज खरात हा कर्जत तालुक्यातील आहे. तो पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईच्या ब्रॅडी हाऊस शाखेत एक खिडकी ऑपरेटर होता. खरात व गोकुळनाथ शेट्टी यांनी नीरव मोदी याच्या कंपन्यांना गैरमार्गाने हमीपत्रे (एलओयू) दिली. त्याआधारे मोदी याच्या कंपन्यांना परदेशातील बँकांतून कोट्यवधी रूपयांची रक्कम अदा करण्यात आली होती.