इतर देशाच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली पण…

0

नवी दिल्ली: कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. दररोज रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याने चिंता अधिक वाढली आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारतातील “रिकव्हरी रेट” चांगले असल्याने दिलासादायक स्थिती आहे. भारतातील मृत्युदरही इतर देशाच्या तुलनेत कमी असल्याची माहिती देत मोदींनी देशवासीयांना दिलासा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज “मन की बात” या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला.

इतर देशाच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली असली तरी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अजून देश यातून मुक्त झालेला नाही. सुरुवातीला जितका घातक होता तितकाच घातक कोरोना अजूनही आहे असे देखील मोदींनी सांगितले. चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल लावणे, सामाजिक अंतर राखणे, सातत्याने हात धुणे, स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. हेच आपले हत्यार आहे, याच्या जोरावरच कोरोनाला हरवीत येईल असे मोदींनी सांगितले.