इनरव्हिल क्लबतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

0

पाचोरा। शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयात इनरव्हील क्लब ऑफ पाचोरा-भडगांव यांच्या वतीने 5 मुलींना दत्तक घेऊन शैक्षणिक वाटप नुकतेच करण्यात आले. इनरव्हील क्लब ऑफ पाचोरा-भडगांव तर्फे दरवर्षी माजी अध्यक्षा चंदा जवाहर संघवी यांच्या दातृत्वाने 5 मुलींना दत्तक घेऊन वर्षे भर त्यांच्या शैक्षणिक साहित्यसह शैक्षणिक फी भरण्यात येते. यंदाच्या वर्षी देखिल खुशाली महादेव चित्तकवार (7 वी), अंजली भगवान गायकवाड (7 वी), गौरी ज्ञानेश्वर सोनार (9 वी), हर्षदा सुनील पाटील (8 वी), साक्षी गोपाल पवार (10 वी) या मुलींना इनरव्हील क्लब च्या माध्यमातून सौ. संघवी यांनी दत्तक घेतले आणि शैक्षणिक साहित्य वाटप केले.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रशासकीय अधिकारी सचिन सोमवंशी, कॉग्रेस उपाध्यक्ष अनिल पाटील, प्राचार्य संजय पवार, दत्तक योजना दाता चंदा संघवी, व्हाईस प्रेसिडेंट लक्ष्मी लोढाया, सेक्रेटरी रिना कोटेचा, आयएसओ हिना अग्रवाल, माजी अध्यक्षा उज्वला महाजन, वृंदा पाटील, माया सुर्यवंशी, सुप्रिया सोमवंशी, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. मदतीचे हात वाढले पाहिजे असे आवाहन आपल्या मनोगतात सचिन सोमवंशी यांनी व्यक्त केले. यावेळी एस.एस.पाटील, पो.जी.चौधरी, श्री. राजपुत, माळी आदी उपस्थित होते.