पाचोरा । पाचोरा येथील इनरव्हिल क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त कोंडवाडा गल्लीतील कन्या माध्यमिक विद्यालयाचया 250 विद्यार्थीनींची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य डॉ. सुजीत परदेशी, प्रमुख पाहुणे म्हणून इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रेखा मोर, सचिव नेहा कोटेचा, ट्रेसरर लक्ष्मी लोढाया, रिना अग्रवाल, रिना कोटेचा, रिना परदेशी, प्रतिभा बोरक, चंदा संघवी, सदस्या माया सुर्यवंशी, उज्ज्वला महाजन, प्रा. प्रतिभा परदेशी, सोनल बसंत, गायत्री जगताप, प्रतिभा पाटील, संगिता राजपूत, जयश्री चव्हाण, प्राचार्य संजय पवार, प्राध्यपक शिवाजी शिंदे, प्रा. पवार, घोडेस्वार, बाविस्कर हे उपस्थित होते.
शहरातून काढली रॅली
पाचोरा येथील कन्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनींना डॉ. सुजीत परदेशी यांनी आरोग्यावर सखोल मार्गदर्शन करुन रोटरीचे ज्येष्ठ सदस्य अतुल शिरसमणी यांनी विद्यार्थीनींना मोफत संगणकीय प्रशिक्षण देण्याचे आश्वासन यावेळी दिले. विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेपासून ‘बेटी बचाव बेटी पढाव’चा संदेश देत जामनेर रोड, शिवाजी चौक ते शासकीय रुग्णालयापर्यंत रॅली काढण्यात आली. वैद्यकीय आधिकारी डॉ. मंदार कळमबेकर, डॉ. इमरान पठाण, डॉ. अतुल महाजन यांनी 250 विद्यार्थीनींची आरोग्य तपासणी केली.