पिंपरी- इनरव्हील क्लब ऑफ पिंपरीच्या मावळत्या अध्यक्षा संगीता देशपांडे यांनी मनीषा समर्थ यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे दिली. नवीन कार्यकारणीमध्ये वैशाली शहा, सुप्रभा आलोणी, नीतू रोशा, मंजू शर्मा, शालिनी चोप्रा, अनुराधा सूद, हंसा मोहन, बेला अगरवाल, विनिता अरोरा, प्रतिभा कुलकर्णी, वैशाली जैन यांचा समावेश आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून इनरव्हील क्लब 313 च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन रेणू गुप्ता उपस्थित होत्या. कार्यक्रमात क्लबच्या ‘पहचान’ पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.
रेणू गुप्ता यांनी नवनिर्वाचित सदस्यांना विविध उपक्रमांची माहिती देत आपापली क्षेत्रे निवडून कामाला लागण्याचा सल्ला दिला. मनीषा समर्थ यांनी “शिक्षण, आर्थिक सधनता, आरोग्य, शिक्षण, महिला सुरक्षा आणि पर्यावरण याविषयी विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे. काही उपक्रमांवर सध्या काम सुरू झाले आहे. नागरिकांच्या सहभागातून यशस्वी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनिता अरोरा आणि अनघा रत्नपारखी यांनी केले. आभार प्रतिभा कुलकर्णी यांनी मानले.