इनरव्हील क्लबतर्फे भुसावळात महिला पोलिसांचा सत्कार

0

भुसावळ- इनरव्हील क्लब ऑफ भुसावळतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून गुरुवार, 14 रोजी पंचायत समितीच्या सभागृहात शहरातील सर्व महिलांचा सहृदय सत्कार करण्यात आला. दिव्या राठोड व आरती चौधरी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक सारीका खैरनार, शालिका बलके, आशा तडवी, स्मिता अहिरे, संगीता निळे, प्राची चौधरी, संगीता चौधरी, मोना कोळी, अश्‍विनी जोगी, छाया पाटील, अर्चना अहिरे, प्राची जोशी, विजया घेटे, भाग्यश्री चौधरी आदींचा सन्मान करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीच्या अध्यक्षा सुनीता पाचपांडे, सचिव मृणाल पाटील, सदस्या मोना भंगाळे, पल्लवी वारके, कविता पाचपांडे, रेवती मांडे, आदिती भडंग, हेमलता सोनार, सीमा सोनार, स्मिता चौधरी आदींची उपस्थिती होती.