देहूरोड : धार्मिक तणावापासून सदैव दूर असलेल्या देहूरोड परिसरात सध्या रमजानचे रोजे सोडण्यासाठी विविध मशीदींमध्ये इफ्तार पार्ट्या रंगु लागल्या आहेत. विशेष म्हणजे शहरातील हिंदु-मुस्लिम बांधव एकत्रीतपणे या कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेताना दिसत आहेत. एकंदरीतच सध्या शहरात सलोख्याचे वातावरण निर्माण झाले आहे. रोजा हा केवळ उपवास नसून आपल्या इंद्रियांना वाईट गोष्टींपासून अलिप्त ठेवण्याचा तो एक पवित्र मार्ग आहे, अशी रमजानच्या पवित्र उपवासाची महती येथील जामा मशीदीचे जलील शेख यांनी उद्धृत केली. त्याला उपस्थित सर्वधर्मिय पाहुण्यांनी उत्स्फुर्त दाद दिली. निमित्त होते रोजा इफ्तार पार्टीचे. येथील सर्वात जुन्या असलेल्या जामा मशीदीत सर्वधर्मियांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
सहाय्यक आयुक्त गणेश शिंदे, निरीक्षक विजय पळसुले, उपविभागीय अधिकारी गणपतराव माडगुळकर, वरीष्ठ निरीक्षक प्रकाश धस, मावळ राष्ट्रवादीचे बापूसाहेब भेगडे, तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक सुनिल शेळके, भाईजान काझी, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य गोपाल तंतरपाळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अॅड. कृष्णा दाभोळे, यदुनाथ डाखोरे, मिकी कोचर, सामाजिक कार्यकर्ते धर्मपाल तंतरपाळे, साऊथ इंडियन असोसिएशनचे जयशंकर टी. जयसिंग, राजु नाडार आदी यावेळी उपस्थित होते.
विविध भागात पार्टीचे आयोजन
विकासनगर येथील भारतरत्न वसाहतीत ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका प्रज्ञा खानोलकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष व कॅन्टोन्मेंट सदस्य हाजीमलंग मारिमुत्तू, मनोज खानोलकर, उपनिरीक्षक अबुबकर लांडगे, नरेंद्र महाजनी, श्रीरंग सावंत, सुशिला नरवाल, सावळाराम वानखेडे, संघाचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य गफुरभाई शेख यांनी रमजानच्या उपवासाचे महत्व सांगितले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संघाचे कार्याध्यक्ष इलियास खान, उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर कुदळे, पंढरीनाथ सानप, पांडुरंग येल्लटीकर माणिक एकाड, रविंद्र कदम यांनी पुढाकार घेतला.
पारशीचाळ येथील जामा मशीदीत स्थानिक तरूणांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. उपनिरीक्षक मनोज पवार, कर्मचारी योगेश जाधव, सावंत तसेच गोपाल तंतरपाळे, भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष माऊली सोनवणे, तालुका उपाध्यक्ष सुनिल कडलक, पिंपरी-चिंचवडचे अंकुश कानडी, सुरेश भालेराव फुले-शाहु-आंबेडकर विचार मंचचे धर्मपाल तंतरपाळे आदी उपस्थित होते.