मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खानला ’न्युरोएन्डोक्राईन ट्युमर’ हा कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इरफाननेच ही माहिती ट्विटरद्वारे दिली. उपचारासाठी तो विदेशात जाणार आहे.
दुर्धर आजाराने ग्रासले असल्याचे इरफान खानने गेल्या आठवड्यात ट्विटरद्वारे सांगितले होते. मात्र, तो दुर्धर आजार कोणता, याबाबत स्पष्ट केले नव्हते. त्यामुळे इरफानला नक्की कोणता आजार झाला आहे, याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात होते. निदान झाल्यानंतर आपण या दुर्धर आजाराविषयी सांगू, असे इरफानने स्पष्ट केले होते. अखेर शुक्रवारी त्याने ट्विटरवर त्या दुर्धर आजाराविषयी माहिती दिली. त्याला ’न्युरोएन्डोक्राईन ट्युमर’ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.