इरोम शर्मिलाचा सायकलवरून प्रचार

0

इम्फाळ । मणिपूरमधील आगामी विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार हळूहळू वेग पकडत आहे. या निवडणुकीत राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करणार्‍या इरोम शर्मिला यांनी थोऊबल मतदारसंघात सायकलवरून घराघरांत प्रचार सुरू केला आहे. थोऊबल हा ओकराम सिंग यांचा बालेकिल्ला असून या मतदार संघातून ते दोन वेळा निवडून आले आहेत. प्रचारासाठी इरोम दररोज सायकलवरून राजधानी इम्फाळ ते थोऊबल असा 35 किलोमीटरचा प्रवास करत आहेत. थोऊबलला पोहोचल्यावर इरोमा कार्यकर्त्यांनी स्थानिक समाजमंदिरांमध्ये आयोजित केलेल्या सभेत लोकांना पीपल्स रिसर्जेस अँड जस्टिस अलायन्सला मतदान करण्याचे आवाहन करतात
इरोम यांच्या प्रचारात कार्यकर्तेही हिरिरीने सहभागी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत इरोम यांच्या जोडीने थंगमेबंद मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले एरोंडो लेंचोबम यांनी सांगितले की विधानसभेच्या निवडणुकीसाठी पार्टीला फक्त तीन लाख 10 हजार रुपयांचा निधी गोळा केला आहे. ऑनलाइन माध्यमातून तीन लाख आणि ऑफलाइन माध्यमातून पार्टीला 10 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.