इलेक्ट्रिक शॉक लागुन भोकरीच्या महिलेचा मृत्यू

0

रावेर- घरातील पंखा सुरू करतांना इलेक्ट्रिक शॉक लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील भोकरी येथे मंगळवारी घडली. रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ज्योती वसंत लहासे (35) असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी रात्री लहास यो भोकरी येथील त्यांच्या घरात पंखा सुरू करण्यासाठी प्लगमध्ये पिनची वायर लावत असताना त्यांना इलेक्ट्रिक शॉक लागला. नातेवाईकांनी त्यांना गंभीर अवस्थेत रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी मयत घोषित केले. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी खबर दिल्यवरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजु जावरे पुढील तपास करीत आहे.