An electrical shop was broken into on Khadka Road in Bhusawal : Within 48 hours, the market was caught by the police भुसावळ : इलेक्ट्रीक दुकानातील खिडकी तोडून दुकानातील सुमारे 67 हजारांचे साहित्य लांबवण्यात आल्याची घटना खडका रोडवरील अयान इलेक्ट्रीकमध्ये दोन दिवसांपूर्वी घडली होती. बाजारपेठ पोलिसांनी 48 तासात चौघा चोरट्यांना अटक करीत त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल जप्त केला आहे. शादाबखान शकीलखान (24), साहील शेख सलीम शेख (20), रेहानखान शकीलखान (19) व वसीम शहा फारुक शहा (21) अशी अटकेतील आरोपींचे नावे आहेत.
मध्यरात्री केली होती चोरी
खडका रोडवरील नवीन ईदगाहजवळील कॉम्पलेक्समध्ये मोहम्मद फिरोज मोहम्मद नसिमखान (रा.द्वारका नगर, भुसावळ) यांच्या मालकीचे अयान ईलेक्टीक दुकान आहे. 3 रोजी चोरटयांनी दुकानाच्या मागील बाजुची खिडकी तोडुन दुकानातील पाणी भरण्याच्या ईलेक्ट्रीक 13 लहान-मोठ्या मोटार, कुलरच्या पाच मोटार, हॅड ग्राईंडर तीन, सिलिंग फॅन 10 व इलेक्टीक वायर तसेच 30 किलो कॉपरची जुनी वायर असा एकूण 67 हजारांचा मुद्देमाल लांबवला होता.
पहाटे आवळल्या आरोपींच्या मुसक्या
बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड यांना खडका रोडवरील चोरीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विजय बळीराम नरेकर, निलेश बाबुलाल चौधरी, उमाकांत पन्नालाल पाटील, प्रशांत रमेश परदेशी, योगेश नामदेव माळी, जावेद शहा हकीम शहा आदींच्या पथकाने बुधवारी चार वाजता मुस्लीम कॉलनीतून शादाबखान शकीलखान, साहील शेख सलीम शेख, रेहानखान शकीलखान, वसीम शहा फारुक शहा यांच्या मुसक्या बांधल्या. आरोपींच्या ताब्यातून चोरलेला मालही ताब्यात घेण्यात आला. आरोपींना बुधवारी न्यायालयाने शुक्रवार, 7 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे व निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर, निलेश चौधरी, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, योगेश माळी, जावेद शहा हकीम शाह, जितेद्र पाटील, दिनेश कापडणे यांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.