इसिएतर्फे चिखलीतील शाळेत पर्यावरण समितीची स्थापना

0

कचरा संकलन उपक्रम राबविणार

निगडी : पर्यावरण संवर्धन समिती (इसिए)तर्फे चिखली येथील बालाजी इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये पर्यावरण समितीची स्थापना करण्यात आली. इसिए संस्थापक अध्यक्ष विकास पाटील, प्रभाकर मेरुकर, दत्तात्रेय कुमठेकर, गोविंद चितोडकर, शाळेच्या संचालिका सुवर्णा जरे, मुख्याध्यापिका ज्योस्ना फालके, स्वाती जाधव, धनश्री खोत उपस्थित होते. भविष्यात ई कचरा आणि प्लास्टिक कचरा संकलन उपक्रम प्रत्येक शाळेतून कायम स्वरूपी घेतला जाणार आहे असे, विकास पाटील यांनी सांगितले.

तुटकी खेळणी जमा केली
शाळेमधील पर्यावरण दूतांच्या सहकार्याने सर्व विद्यार्थ्यांना केलेल्या आवाहनानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरातील सुके प्लास्टिक, तुटकी खेळणी, प्लास्टिक बाटल्या त्याच बरोबर इलेक्ट्रॉनिक, तुटकी खेळणी आणि उपकरणे शाळेत जमा केली. ते सर्व साहित्य समारंभ पूर्वक इसिए टीमकडे सोपविले. जमा झालेले प्लास्टिक व इतर वस्तू सरकार मान्य रिसायकलर मंडळीस सुपूर्द करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली भालेराव यांनी केले. आभार सरिता शेटे यांनी मानले.