पर्यावरण संवर्धनाच्या धोरणांना पाठींबा देण्यासाठी
पिंपरी : विद्यार्थ्यांच्या मनावर शालेय वयातच पर्यावण संवर्धनाचे संस्कार व्हावेत. त्यांना स्वच्छतेच्या सवयी लागल्या पाहिजेत. तसेच प्लास्टीक वापट टाळावा या भावनेतूनच पर्यावरण संवर्धन समितीतर्फे (इसिए) पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांसाठी 18 ते 23 जून दरम्यान पर्यावरण आठवडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी दिली.
मागील अनेक वर्षांपासून शहरातील सर्व शाळांमधून पर्यावरण संवर्धना बाबत सकारात्मक वातावरण निर्मिती करण्यात पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व शाळांसोबत कार्यरत राहून पर्यावरण संवर्धन समिती यशस्वी होत आहे. शहरातील पर्यावरण संवर्धन कामातील सर्व शाळांचा पुढाकार लक्षात घेता, त्यांना सकारात्मक पाठिंबा व शाबासकी देण्यासाठी पर्यावरण आठवडा स्पर्धा 18 ते 23 जून 2018 आयोजित केली आहे. भारत सरकारच्या पर्यावरण संवर्धनाच्या धोरणांना ताकद व पाठींबा देण्यासाठी शहरातील सर्व शाळातून पर्यावरण आठवडा साजरा होणे बाबत आम्ही प्रयत्नशील आहोत, असे समितीने सांगितले.
स्पर्धेच्या अटी व नियम
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. 1) त्यामध्ये शाळेचे नांव व संपर्क, नंबर, ई-मेल, पत्ता व तपशील, सध्या शाळेच्या आवारात असलेल्या झाडांची संख्या, सध्या अस्तित्वात असलेल्या झाडांची नावे, शाळा आवारात झाडे लावण्यास मोकळी जागा आहे का, आवारात किती झाडे लावता येथील. 2) पर्यावरण संवर्धन व वृक्ष लागवड/संवर्धनसाठी पर्यावरण जनजागरण दिंडी/प्रभात फेरी शाळेच्या जवळच्या परिसरात आयोजित करावी. 3) विद्यार्थ्यांमार्फत झाडांच्या बियांचे संकलन करणे आणि घरी अथवा शाळेत रोपे बनविण्यासाठी मार्गदर्शन करणे. 4) शाळा आवारात रोपे लागवड उपक्रम सर्व विद्यार्थी मिळून एकत्रित करावा. 5) शाळेने केलेले आठवडा भरातील उपक्रम ई-मेल द्वारे इसिएला कळविणे. त्यानुसार इसिए त्याची नोंद घेवून इसिए तर्फे त्यांचा गौरव अथवा कौतुक केले जाईल. 6) सदर अहवाल 25 जून 2018 पर्यंत इसिएला फोटो सहित पाठवावा. 7) कोणत्याही शाळेला काही मदत अथवा सहकार्य हवे असल्यास 7798811512 या भ्रमनध्वनीवर संपर्क साधावा. तसेच पसेशलर100 सारळश्र.लेा या ई-मेलवर माहिती पाठवू शकता. कागदावर आलेले लिखाण अथवा अहवाल स्वीकारला जाणार नाही. माहिती पाठविण्याची मुदत 25 जून 2018 आहे.